Thursday, January 19, 2012

अद्रुश्य मूर्ती - तेनाली रामन्


एकदा राजा क्रुश्ण्देवरयाच्या मनात आलं की आपलं नगर इतकं सुंदर झालंय तरी पण काहीतरी कमी आहे असं वाटतं.
खूप विचार करून राजाने असं ठरवलं की आपण भगवंताचं एक सुंदर मंदीर बांधायचं.राजाद्न्या सुट्ली.मंडळी कामाला लागली.

प्रथम एक योग्य अशी जागा शोधन्यात आली.भुमिपुजन झालं.मजूर जमीन खणायला लागले.
खणता खणता त्यांना एका जुन्या मंदीराचे भग्नावशेश मिळाले.राजाला हे कळविण्यात आलं.
राजाला खूप आनंद झाला.मंदिराच्या जागीच मंदीर होणार हा त्याला शुभसंकेत वाटला.
काही दिवसांनी खणताना मजुरांना श्रीभगवंताची एक सोन्याची संपुर्ण मूर्ती मिळाली.
मंदिराच्या कामाची मुख्य जबाबदारी राजाने प्रधानजीवर सोपवली होती.

त्यांना ही मुर्ती पाहुन हाव सुटली.त्यांनी ही गोश्ट राजापर्यंत पोहोचूच दिली नाही.मजुरांची तोंडं बंद करुन ती मूर्ती गुपचुप आपल्या घरी नेऊन ठेवली.
मजुरांची तोंडं बंद केली खरी, पण त्यातला एकजण तेनालीरामचा गुप्तहेर होता.
त्याने ही बातमी अलगद तेनालीरामच्या कानावर घातली.तेनालीने त्या मजुराला ’याची कुठेही वाच्यता करु नकोस’ म्हणुन सांगितलं.

यथावकाश त्या जागी अत्यंत सुंदर देखणं मंदीर उभं राहीलं.
तुंगभद्रेच्या किनारी हिरवाईत डौलात उभं असलेले ते भव्य मंदीर बगून नजर खिळून जाइ अगदी.
मग राजा मंत्रीमंडळासह मंदीर पाहायला आला.तो खूपच खुश झाला.
मग म्हणाला,"इतक्या सुंदर मंदिरासाठी मूर्तीही तितकीच सुंदर हवी नाही का?" सगळ्यांनीच दुजोरा दिला.मग बोलत बोलत सगळे दरबारात परत आले.

अशी सुंदर मुर्ती कुठुन आणावी,घड्वून घ्यावी यावर चर्चा सुरु झाली. तेवढ्यात एक संन्यासी दरबारात येऊन म्हणाला,"अलख निरंजन!" राजाने उठून त्याचं स्वागत केलं.
सन्यासी म्हणाला,"राजन,मुर्ती कुठेही शोधायची गरज नाही.मूर्तीच्या रुपाने श्रीभगवंत स्वत:च नगरीत प्रगटलेत.पण सध्या ते अद्रुश्य रुपानेच आहेत."

राजा गोंधळून म्हणाला," पण महाराज,आम्ही या अद्रुश्य मुर्तीला कसं शोधावं?"
क्शणभर डोळे बंद करुन संन्यासी शांतपणे उभा रहीला.मग म्हणाला,"राजन,मला ती मुर्ती आत्ता प्रधानजींच्या घरी कपाटात दिसतेय."

हे ऎकताच प्रधानजी चपापले. चमकून त्यांच्याकडे पाहणारया राजाच्या नजरेतून ही गोश्ट सुटली नाही.
मनात त्याने ओळखलं.त्याने प्रधानजींना ताबड्तोब ती मुर्ती दरबारात हजर करायचा आदेश दिला.
मग संन्याशाला आसन ग्रहण करायला सांगुन सेवकांकरवी दुध आणून दिले,संन्याशाने दुध प्यायले.
दुधाचा पेला मिशीसकट सेवकाकडॆ परत दिला.पेल्याला त्याची पांढरी मिशी चिकटली होती.

सगळेजण चकित होऊन बघायला लागले.एका क्शणात सगळ्यांनी तेनालीरामला ओळखलं.
सगळेजण खद्खदून हसायला लागले.राजालाही हसू आवरेना. मग काय तेनालीरामही हसत सुटला.

Share this

0 Comment to "अद्रुश्य मूर्ती - तेनाली रामन्"

Post a Comment