Wednesday, January 18, 2012

अस्वल


अस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वले प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात, स्पेक्टॅकल्ड अस्वलमात्र दक्षिण अमेरिकेत सापडते. मुस्टेलॉइड(यामध्ये पंडाद्य, मिंकाद्य व राकूनाद्य कुळांचा समावेश होतो) व पिनिपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात. जीवावशेषांवरून कुत्रा व अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजाचे वंशज आहेत हे लक्षात येते


वर्णन

अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात.
ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा, किंवा हवेतील वास हुंगण्यासाठी ते बहुधा मागील पायांवर उभे राहिलेले दिसतात



खाद्य

अस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी बव्हंशी अस्वले फळे, मुळे, किडे व मांस खातात.

Share this

0 Comment to "अस्वल"

Post a Comment