Thursday, January 19, 2012

उंट


उंट हा एक वाळवंटी प्रदेशात राहणारा प्राणी आहे. वाळवंटातील वास्तव्यासाठी त्याची नैसर्गिक जडणघडण झाली आहे.


उंटांच्या मुख्यत्वे दोन जाती आहेत. एक वाशींडी व दोन वाशींडी (बॅक्ट्रीयन उंट). या शिवाय उंटांच्या अजून चार उप-जाती आहेत. या पैकी लामा अल्पाका, ग्वुनाको, विकुना या दक्षिण अमेरिका खंडात आढळणाऋया उप प्रजाती आहेत.

उंट साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जगतो. पूर्ण वाढ झालेल्या ऊंटाची उंची साधारणपणे वाशींडांना धरून सात फूटांपेक्षा जास्त असते. उंटाचा वेगाने धावण्याचा वेग पासष्ट कि.मी. प्रति तास असतो. तर लांबवर पल्ला गाठण्याचा वेग चाळीस कि.मी. प्रति तास असतो.

इतिहास

उंटांच्या अवषेशांवरून असे सिद्ध झाले आहे की एक वाशींडी उंट हे मुलतः अमेरिकेतून अलास्का मार्गे आशिया खंडात पसरले असे मानले जाते. तर दोन वाशींडांचे उंट मूलतः तुर्कस्तान च्या वाळवंटी प्रदेशातून आशिया खंडात पसरले असे मानले जाते. पू्र्वी तुर्कस्तानला बॅक्ट्रीया असे नाव होते त्यावरून बॅक्ट्रीयन उंट असे नाव या प्राण्याला पडले.

वास्तव्य

आज जगात मुख्यतः उंट आफ्रिका खंडात सोमालिया, सुदान या देशांच्या आसपास आढळतात. तसेच आशिया खंडात मंगोलिया, चीन, अफगाणिस्तान, इराक या भागातही आढळतात. भारतातही राजस्थान येथे उंट आढळतात.

वरील सर्व भागातील उंट हे मुख्यतः माणसाळवले गेले आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया खंडाच्या मध्य भागात अजूनही नैसर्गिक उंट आहेत. यांची संख्या सुमारे सात लाख इतकी आहे व त्यांचे प्रजनन ११% दराने वाढते आहे.


उपयोग

सुदान मध्ये उंटांची शेती ही केली जाते. लश्करात उंटांचा वापर करून घेतला जातो.

उंटांचे दूध पिण्यासाठी वापरले जाते.


उंटाचा प्रमुख उपयोग वाळवंटातील वाहन म्हणून केला जातो. त्याची पाणी न पिता तसेच चरबी साठवणूक करण्याची क्षमता यामुळे तो वाळवंटी प्रदेशातील आदर्श वाहन बनतो. उंटाच्या चरबीचा वापर करून घेतला जातो. उंटाचे मांस खाण्यासाठी वापरले जाते तर चामडे पादत्राणे बनविण्यासाठी वापरले जाते. उंटाच्या केसांपासून काही विशीष्ट प्रकारची औद्योगिक वस्त्रेही बनविली जातात.

पूर्ण माहिती विकिपिकिया मध्ये 

Share this

0 Comment to "उंट"

Post a Comment